जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२३
सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही अमळनेर शहरातील श्री नरहरी शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे साजरी करण्यात आली.
अमळनेर शहरातील श्री नरहरी शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रावण शुद्ध त्रयोदशी अनुराधा नक्षत्र या तिथीनुसार दि.२९ ऑगस्ट रोजी सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष प्रसाद सोनार यांनी करून यावेळी सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुष्पाताई सोनार, संगीताताई सोनार, सोनाली सोनार, विद्या सोनार, तेजस सोनार, प्रतिक सोनार यांची उपस्थिती होती.