अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील प्रती पंढरपूर म्हणून ओळखली जाणारी अमळनेर नगरीतील श्री. अंबरीष ऋषि महाराज टेकडीवरील यात्रा द्वादस आषाढ शु. १२ शके १९४५ संवत २०८० म्हणजे दिनांक ३० जून रोजी भरणार आहे. तिर्थ क्षेत्र श्री. अंबरीष महाराज मंदिर संस्थांन व टेकडी ग्रुपतर्फे यात्रेला येणाऱ्या भाविकांचे स्वागत येणार आहे. श्रमदानातून व लोकसहभागातून आजवर टेकडी परिसरात जवळपास ३५०० वृक्षरोपण केले आहेत. तसेच त्या वृक्षांना पाणी देणे त्यांची निगा ठेवणे व त्यांना जगवणे हे पर्यावरणाला पोषक व सृष्टि साठी महत्वपूर्ण तसेच हे एक दैविक कार्य हे करत आहे. व दिनांक ८ जुलै २०१८, रविवार रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी अंबरिष टेकडीवर १ मिनिटात १,१११ वृक्षारोपणाच्या आदर्श पर्यावरणपूरक अभिनव राष्ट्रीय उपक्रम राबविला आहे.
अंबरिष टेकडीवर आजपर्यंत शेकडो झाडे लावून ती वाढविली आहेत. त्यामुळे अंबरिष टेकडीचे पर्यावरण बदलून टेकडीचे नैसर्गिक सौंदर्य वाढण्यास मदत झाली आहे. टेकडीवर यात्रेला किंवा यात्रे नंतर कधीही आल्यावर नास्ता व जेवण केल्यावर उरलेले अन व कागद, युज अॅण्ड थ्रो काही वस्तू रद्दी पेप अश्या वस्तु इकडे तिकडे न फेकता आपण स्वतः प्रत्येकी एक पिशवी आणावी आणि त्यात टाकावे असे आव्हान करण्यात आले आहे.