जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीवर विनयभंग व अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच जळगाव शहरातील एका परिसरात देखील एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात मुल-मुली लपंडाव खेळत असताना, एका ११ वर्षीय मुलीला घरात कोंडून ४० वर्षीय व्यक्तीने तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला, ही धक्कादायक घटना शहरातील रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. वा प्रकरणी बुधवारी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला मुंबईहून पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकरा वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ६ वाजेच्या दरम्यान, रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत संशयित आरोपी सिध्दार्थ वानखेडे (वय ४०) याच्या मुलासोबत अकरा वर्षाची शेजारी राहणारी मुलगी आणि काही मुलं लपंडावाचा खेळ खेळत होती. तेव्हा संबधित मुलगी संशयित आरोपीच्या घरात लपायला गेली असता, त्याच वेळेस सिद्धार्थ वानखेडे हा घरात आला. त्याने त्या मुलीला पाहिल्यानंतर घराचा दरवाजा बंद केला. तसेच घरातील सर्व लाईट देखील बंद करत, मुलीवर अत्याचार केले. पिडीत मुलीने आरडाओरड केला, तसेच संशयित आरोपीच्या हातावर नखांनी ओरखडले. संशयित्ताने मुलीचे तोंड दाबून, तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत, शांत राहण्यास सांगितले. ही माहिती काही दिवसानंतर पिडीत मुलीच्या आई-वडिलांना कळल्यानंतर बुधवारी रामानंदनगर पोलिस स्टेशन संबधितावर भारतीय न्याय संहिता कलमानुसार ६३ (बी), ६५ (२)७४,७६,१२७ (१), ३५१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.