जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२४
शहरातील कासमवाडी परिसरातील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना दि.३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. यात घटनेत अश्विनी प्रकाश पाटील (वय १८) या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कासमवाडी परिसरात अश्विनी पाटील ही विद्यार्थीनी आई, वडील, दोन भावांसह राहत होती. अश्विनीचे वडील प्रकाश पाटील हे खासगी वाहनांवर चालक असून अश्विनी ही शिक्षण घेत होती. काही दिवसांपासून अश्विनीही आजारी असल्याने ती तणावात होती. याच कारणावरुन शनिवार दि. ३ ऑगस्ट रोजी घरी कोणी नसताना अश्विनीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी अश्विनीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.