जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२४
जळगाव शहरातील शिवकॉलनी ते आशाबाबा नगर दरम्यान दि.१५ ऑक्टोबर रोजी रात्री रेल्वे रुळांमध्ये झोपून रामदास बाबुराव महाले (वय ८५, रा. सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा) यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळ्यातील सेंट्रल बँक कॉलनीत रामदास महाले हे वृद्ध वास्तव्यास होते. दि. १५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शिवकॉलनी ते आशाबाबा नगर दरम्यान असलेल्या खांबा क्रमांक ४१७/७ जवळ रेल्वे रुळाच्यामध्ये झोपून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ प्रवीण जगदाळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी मयत वृद्धाची ओळख पटविण्याचे प्रयत्न करीत होते.
मयताची ओळख पटविण्यासाठी त्यांनी परिसरातील नागरिकांना बोलविले. परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मयत वृद्ध हे स्टेट बँक कॉलनीत राहत असल्याचे सांगत त्यांची ओळख पटवली. घटनास्थळाच्या काही अंतरावरच ते राहत होते. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.