मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अस्वस्थ करणारा असेल. कुटुंबातील कलाहामुळे वातावरण खराब होईल. इच्छा नसतानाही भावा-बहिणींमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. घाईत कोणतीही जबाबदारी घेऊ नका. मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात चुकीच्या निर्णयांमुळे नुकसान होईल. गरजेनुसार पैसे खर्च करण्याचा प्रयत्न करा. मानसिक अस्वस्थतेचा परिणाम आरोग्यावर दिसून येईल.
वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आणि फलदायी जाईल. कार्यक्षेत्रात परिस्थिती अनुकूल राहिल. पैशाची आवाक अचानक थांबेल. गुंतवणूक टाळा, अन्यथा त्यात अडकू शकता. तुमचे विरोधक पुन्हा नव्याने उभे राहातील. तुम्हाला संयम राखावा लागेल. तुमचे नुकसान होऊ शकते. प्रेमसंबंधात जवळीक निर्माण झाल्याने मन शांत राहिल. जुन्या वादामुळे घरामध्ये समन्वयाचा अभाव राहिल. घरगुती कामात सहकार्य कमी होईल. सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला न मागता सल्ला आणि मदत मिळेल.
मिथुन – आज दिवसभरात अनेक संधी मिळतील. आळशीपणामुळे काम गांभीर्याने घेणार नाही. कामावर समाधान मानावे लागतील. शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. भविष्यात तुम्हाला प्रतिकूल परिणामांचा सामना करावा लागेल. चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च केल्याने आर्थिक संतुलन बिघडेल. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. पोटाचा त्रास उद्भवेल.
कर्क – आजचा दिवस शुभ असेल. तुम्हाला हवे ते करण्यात यश मिळेल. मानसिक अस्थिरता रागिल. तुमच्या बालीशपणामुळे तुमच्यावर सगळे हसतील. कार्यक्षेत्रात कठोर परिश्रम करावे लागतील. सकारात्मक परिणाम मिळतील. भविष्यात परदेशी वस्तूंच्या व्यापारात गुंतवणूक केल्याने फायदा होईल. महिलांच्या सहकार्याने प्रगतीचे मार्ग खुले होतील. व्यवहारात अधिक काळजी घ्या. वडिलोपार्जित मालमत्ते हिस्सा मिळेल.
सिंह – आजचा दिवस संमिश्र असेल. सरकारी गुंत्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. वादविवाद होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोक त्यांच्या कामात असमाधानी राहाल. सहकाऱ्यांमध्ये अजून काही त्रुटी निर्माण होतील. तुम्हाला राग येऊ शकतो. कुटुंबात चढ-उतारांनंतर परिस्थिती नियंत्रणात राहिल.
कन्या – आजचा दिवस तुमचा चांगला असेल. नैतिकतेने काम करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या सन्मानात वाढ होईल. सामाजिक कार्यात अधिक वेळ द्याल. धार्मिक क्षेत्रात परोपकाराच्या संधीही मिळतील. अचानक आर्थिक लाभामुळे उत्साह वाढेल. कार्यक्षेत्रात सहकारी ठिकाणी गैरसोय होईल.
तुळ – आजचा दिवस भाग्यशाली असेल. कोणत्याही प्रतिष्ठित संस्था किंवा सरकारी क्षेत्राकडून फायदेशीर कामाचे करार मिळू शकतात. कौटुंबिक वातावरण विस्कळीत राहिल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर पैसे खर्च करावा लागेल. जास्त धावपळ केल्याने महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. कामात आळस करु नका. भविष्यात चांगले परिणाम दिसून येईल. केलेल्या कृतींची पुनरावृत्ती लवकरच दिसून येईल. सर्वांशी प्रेमाने वागा.
वृश्चिक – आजच्या दिवशी कार्यक्षेत्रात अडचणी येतील. कामासाठी आजचा दिवस शुभ असेल. धार्मिक कार्यात रुची राहिल. व्यस्ततेमुळे योग्य वेळ देता येणार नाही. व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी अशाल. सहकाऱ्यांच्या मनमानी वागण्यामुळे समस्या उद्भवतील. धनलाभ होऊ शकतो. व्यापारी वर्ग आपेल कार्यक्षेत्र वाढविण्याची योजना आखतील. तब्येतीमुळे थोडे घाबराल.
धनु – आजचा दिवस गोंधळाचा असेल. अनेक नवीन योजनांमध्ये अडथळे येतील. कुटुंबातील सदस्याच्या हट्टीपणामुळे नवीन समस्या उद्भवतील. चुकीच्या बोलण्यामुळे त्रासदायक परिस्थिती उद्भवेल. कामाच्या व्यवसायात अचानक लाभ होईल. तुमच्यात उदासीनता राहिल. आरोग्य जवळपास सामान्य राहिल. पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होतील. आरोग्याची काळजी घ्या.
मकर – आजच्या दिवसाची सुरुवात काही समस्यांनी होईल. तब्येत थोडी कमकुवत राहिल. व्यवसायात काम लवकर सुरु होईल. व्यवसायात नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. भविष्यातील खर्च पाहून काटकसरीने वागाल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस समाधानकारक राहिल. दैनंदिन खर्च सहज भरून निघेल. अधिकाऱ्यांशी सुसंवाद वाढेल. कामात प्रगती होईल.
कुंभ – आजच्या दिवसात तुमची सर्व कामे सुरळीत होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक महत्त्वाचे काम अर्धवट सोडावे लागेल. पैसा येण्याआधीतच मार्ग काढाल. मित्रांसोबत गैरवर्तन करण्यातही पैसे खर्च करावे लागतील. मित्रासोबत काम करावे लागेल. कुटुंबातील सदस्यांची तब्येत अचानक बिघडेल. तुमची प्रकृती ठीक राहिल.
मीन – आजचा दिवस शुभ असणार आहे. तुमच्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची भावना असेल. सहकार्यांच्या मदतीने लहान-मोठी कामे सोपी होतील. चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा विचार येईल. परंतु, नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. आरोग्यात चढ- उताराचा सामना करावा लागेल.