
जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२४
राज्यातील जनतेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ देवून महायुतीने सत्ता स्थापन केली आहे तर गेल्या काही दिवसापासून मंत्री मंडळाचा विस्तार लांबणीवर पडला होता. आज अखेर हा मंत्री मंडळ विस्तार होणार आहे. यात जिल्ह्यातील काही आमदारांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार आहे. यात अजित पवार गटाचे आ.अनिल भाईदास पाटील यांचे देखील नाव निश्चित झाले असल्याचे समजते.
आमदार अनिल पाटील यांना मंत्रिमंडळात शपथ घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा फोन आल्याने अमळनेर विधानसभा मतदार संघाला पुन्हा मंत्रिपद मिळण्याचा मार्ग निश्चित झाला आहे.
पहिल्यांदा अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळाले, तेव्हा त्यांच्या मातोश्री पुष्पाबाई शेतात काम करत होत्या. या वेळी मात्र अनिल पाटील यांच्या मातोश्री तसेच तालुक्यातील कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. अनिल पाटील यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळणार असल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मंत्रीपदामुळे तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.