अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, संस्था, राष्ट्रप्रेमी व विविध मंडळांच्या सहकार्याने श्री राम नवमी शोभायात्रा गुरुवार दि. ३० मार्च रोजी सकाळी ठिक ८.०० वा. निघणार आहे. त्यामुळे अमळनेर शहरात ‘जय श्री राम’ च्या घोषणांनी दुमदुमणार आहे.
शोभायात्रेचा प्रारंभ मंगला देवी चौक, पवन चौक, तिरंगा चौक, दगडी दरवाजा, पान खिड़की, वाडी चौक, भोईवाडा, माळीवाडा, झामी चौक, समारोप मंगलादेवी चौक येथे होईल. या मार्गावर आपल्या परिसरातील स्वच्छतेसाठी तसेच मार्ग सुशोभित करण्यासाठी व शोभायात्रा यशस्वीतेसाठी आपल्या परिने सहकार्य करावे.