
जळगाव मिरर | १८ मे २०२५
जळगाव जिल्हा सत्र व कौटुंबिक न्यायालयात वकिली म्हणून कामकाज करीत असलेल्या सौ. सीमा एन पाटील (जाधव) यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सौ.सीमा पाटील (जाधव) यांचे संपूर्ण कुटुंब वकील क्षेत्रात कार्यरत आहे. सौ .सीमा पाटील वकिली करून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, रेड स्वास्तिक, निसर्ग आणि पर्यावरण संस्थेत व सामाजिक कार्यात सक्रिय आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.