अमळनेर : विक्की उत्तम जाधव
विजयनाना पाटील आर्मी स्कूल व जूनियर कॉलेज येथे “उत्सव आनंदाचा” हे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले . सुरुवातीला सस्थेचे अध्यक्ष नानासाहेब विजय नवल पाटील, युवा उद्योजक अभिषेक पाटील व मान्यवरांना शिस्तीत पथसंचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. यासाठी प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील यांनी पथसंचलन साठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. केंद्रीय मंत्री व संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील होते. सर्वप्रथम सरस्वतीचे पूजन होऊन रुक्मिणीताई व नवलभाऊ यांच्या प्रतिमेचे ही पूजन करण्यात आले व पुष्पाहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीप प्रज्वलनाने स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. नंतर प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. त्यात संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांचे स्वागत प्राचार्य पी एम कोळी यांनी केले, त्यानंतर प्रमुख अतिथी युवा उद्योजक अभिषेक अविनाश पाटील यांचे स्वागत प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील यांनी केले.
प्रमुख अतिथी नरेंद्र निकुंभ यांचे स्वागत सुभेदार मेजर श्रीराम पाटील यांनी केले, प्रमुख अतिथी दिनेश नाईक यांचे स्वागत नायब सुभेदार भटू पाटील यांनी केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. सुरुवातीला प्राचार्य पी एम कोळी यांनी प्रास्ताविक केले व स्नेसंमेलनाचे उद्दिष्ट सांगितले. नरेंद्र निकुंभ व दिनेश नाईक या प्रमुख अतिथींनी मनोगत व्यक्त केले. आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सैन्यदलातील योगदान व शहरातील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलनाचे कौतिक केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना विजय नवल पाटील यांनी सैनिकी शाळेतील मुलांचे भारतीय सैन्य दलामध्ये कसे योगदान आहे हे पटवून सांगितले व वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपल्या आर्मी स्कूलच्या मुलांचे योगदान कसे असते , तसेच भविष्यामध्ये भारतीय संरक्षण यंत्रणेमध्ये मुलांचे योगदान नक्कीच राहील याबाबत आश्र्वत केले व मुलांच्या प्रगतीबाबत पालकांना निर्धास्त राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.त्यात नृत्य, समूह नृत्य ,मूकअभिनय, नाटिका ,लावणी, देशभक्तीपर गीते, गीतगायन, ब्रेकडान्स या सर्व कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलाआविष्कराचे सुंदर प्रदर्शन केले. लावणीतील प्रणव निकम, सुदर्शन पाटील चेतन पाटील ह्या विद्यार्थ्यांची महिला वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. देशभक्ती गीतावरील साजरीकरण व रामायणातील दृश्यांचे सादरीकरण हे लक्षवेधी ठरले. रामायणातील या पात्रांच्या मनमोहक सादरीकरणाला विजय नवल पाटील यांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती प्राजक्ता शिंदे यांचेही कौतुक करण्यात आले. सर्व कार्यक्रमांना पालकांसहित शिक्षकांनीही खूप दाद दिली. उद्घाटनाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख शरद पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्याचा परिचय बी. डी. पाटील यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रसिद्धी प्रमुख अनिल पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ज्येष्ठ शिक्षक व्हि जी बोरसे, कार्यक्रमासाठी एस एन महाले, व्हि डी पाटील यांनी तसेच सर्व समिती प्रमुख, सर्व वर्गशिक्षक, सहाय्यक शिक्षक, शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी- शिक्षक, विद्यार्थीनी- शिक्षिका, सहभागी विद्यार्थी , इतर विद्यार्थी नी मोलाचे सहकार्य केले.यावेळी संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड , नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा. श्याम पवार, रुख्मिणीताई प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी बी टी पाटील, रुख्मिणीताई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस जे शेख , शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी पी चौधरी, कृषी महावद्यालयाचे प्राचार्य डॉ. शुभांगी चव्हाण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य के बी बाविस्कर, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते