
जळगाव मिरर | १९ मे २०२६
राहत्या घरामध्ये गळफास घेऊन प्रकाश अनिल बडगुजर (वय २५, रा. बिबानगर, पिंप्राळा) यांनी आत्महत्या केली. ही घटना दि. १७ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. बहिणीने दरवाजा उघडताच तिला भावाचा मृतदेह दिसताच तीने मनहेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरात राहणारे प्रकाश बडगुजर हे केटरींचे काम करतात. दि. १७ रोजी त्यांनी जेवण केले आणि त्यानंतर ते झोपून गेले झोपेतून उठून ते दुसऱ्या खोलीत गेले आणि तेथे त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. बराच वेळ झाल्याने भाऊ कोठे गेला म्हणून त्यांची बहीण दुसऱ्या खोलीत पाहण्यासाठी गेली. त्या वेळी तिला प्रकाश बडगुजर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





















