जीवनाच्या प्रवासात काही व्यक्ती
फक्त सोबत चालत नाहीत,
तर वाट दाखवतात, सावली देतात,
आणि थकलेल्या पावलांना आधार होतात…
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे असेच एक नाव आहे., जे उच्चारताच विश्वास जागा होतो.
पितृतुल्य अशोक भाऊ खऱ्या अर्थाने सर्वांचे आधारवड आहेत.
त्यांच्या शब्दांत मायेची ऊब आहे,
तर कृतीत कर्तव्याची निष्ठा आहे.
कोणाच्याही यशात ते पुढे नसतात,
पण प्रत्येक यशामागे त्यांचा हात असतो.
क्रीडा असो वा आरोग्य,
शिक्षण असो वा धर्म,
सामाजिक, सांस्कृतिक प्रवाहांत
ते सतत आशेचा दीप प्रज्वलित करतात.
प्रोत्साहन देताना ते मोजत नाहीत वेळ, श्रम वा साधनं, कारण त्यांच्यासाठी समाज हेच कुटुंब आहे.
राष्ट्रीय पातळीवर जळगावचे नाव उज्ज्वल करणाऱ्यांसाठी ते सुख-सुविधांचा,साहित्यांचा पूल उभारतात, स्वप्नांना पंख देतात आणि म्हणतात. “तू पुढे जा, आम्ही मागे उभे आहोत.”
आई कांताईंच्या मायेचा ओलावा
आणि श्रद्धेय भवरलालजी जैन
अर्थात मोठेभाऊ यांच्या संस्कारांचा दीप
आजही त्यांच्या विचारांत तेवत आहे.
वसा जपताना त्यांनी वारसा उजळवला,
आणि मूल्यांची मशाल पुढील पिढीकडे सोपवली.
अशोकभाऊ म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे,
एक आधार आहे, एक संस्कार आहे,
एक शांत पण तेजस्वी माझ्या जीवनातील उपस्थिती आहे. अनेक जीवनांच्या अंधारात
ते आजही आशेचा उजेड पेरत आहेत…
आदरणीय अशोक भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
– देवेंद्र पंढरीनाथ पाटील,




















