• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 20, 2026
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मे २०२६ 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या आणखी एका बांगलादेशी महिलेला शोधण्यात जळगाव पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करत पोलिसांनी एका महिलेविरुद्ध इमिग्रेशन आणि परदेशी कायदा, २०२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून बनावट कागदपत्रांच्या आधारे परदेशी नागरिक भारतात राहत असल्याचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे मूळ नाव फरीदा बेगम मोहम्मद खान (वय ४२) असून ती बांगलादेशातील भीमकाठी, उपजिल्हा नाझीरपूर, जिल्हा पीरोजपुर येथील रहिवासी आहे. भारतात आल्यानंतर तिने स्वतःची ओळख लपवत “जस्मिन बी मोहम्मद खान” या नावाने भुसावळमधील दीनदयाल नगर परिसरात वास्तव्य सुरू केले होते.  प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपीने धक्कादायक माहिती दिली. तिने सन २००९ मध्ये एका दलालास सुमारे ५ हजार रुपये देऊन बोटीच्या सहाय्याने नदीमार्गे बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानंतर रेल्वेने ती भुसावळ येथे पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल फोन जप्त केला. मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणात ॲपद्वारे +880 या बांगलादेशी कंट्री कोडवरील क्रमांकांशी सातत्याने संपर्क, चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलिंग झाल्याचे पुरावे समोर आले. मोबाईलमध्ये आरोपीच्या जन्मदाखल्याची प्रतही पोलिसांना आढळून आली.  यापुढील चौकशीत आणखी गंभीर बाब उघड झाली. आरोपीने तिच्या मृत बहिणीच्या नावावरील वीजबिल आणि इतर कागदपत्रांचा वापर करून स्वतःच्या नावाने रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि भारतीय पासपोर्ट तयार करून घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

विशेष म्हणजे, या बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे आरोपी महिला मे २०२३ मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतात परतल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासातून झाला आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रे तयार करणाऱ्या व्यक्ती, एजंट आणि दलालांचे जाळे सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक २६५/२६ अन्वये इमिग्रेशन आणि परदेशी कायदा, २०२५ मधील कलम २१, २२ व २३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला बनावट कागदपत्रे तयार करून देणारे संबंधित एजंट, दलाल व इतर व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, जळगाव पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या अथवा बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group