जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२४
तालुक्यातील म्हसावद येथील रहिवासी गावाच्या शेजारी शौचास गेले असताना दोन भावंडांचा पाय घसरून तोल गेल्याने ते नदीत कोसळले. काही तरुणांना ते दिसताच त्यांनी नदीपात्रात उड्या टाकल्या. त्यात दोघांपैकी लहान भावाचा बुडाल्याने मृत्यू झाला. तर मोठ्या भावाला वाचवण्यात यश आले. ही घटना रविवारी दुपारी २ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हसनैन रफिक शेख (वय १०) असे मृत बालकाचे नाव आहे. त्याचा मृतदेह तीन तासांच्या प्रयत्नानंतर घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावर नदीपात्रात सापडला. हवालदार स्वप्निल पाटील, सहकारी, मंडळ अधिकारी अजिंक्य जोंधळे व बचाव पथक जळगाव येथून दाखल झाले होते. दरम्यान, हसनैन शेख याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.