जळगाव मिरर | २९ जुलै २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा हाहाकार सुरु असल्याने अनेक रस्त्यावर अपघाताची देखील मालिका सुरु आहे. नुकतेच नांदेड शहरातील श्रीनगर येथील मुख्य रस्त्यावर सततच्या पावसामुळे शिरसचे झाड शेजारून जाणाऱ्या दुचाकीवर कोसळले. रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमाराह ही घटनाघडली. त्यात दुचाकीवरील १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला, तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले. यश गुप्ता (१०) असे मृत बालकाचे नाव आहे. परिसरातील नागरिकांनीधाव घेत दुचाकीवर पडलेले झाडउचलून जखमींना बाहेर काढले.त्यांच्यावर खासगी रुग्णालयातउपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातगेल्या चार दिवसांपासून पावसाचीसंततधार सुरू आहे. नदी-नाले हीदुथडी भरून वाहत आहेत.शहरातूनही अनेक भागात रस्त्यांवरपाणी साचले आहे. रविवारी नांदेडशहरातील श्रीनगरच्या मुख्य रस्त्यावरवाहतूक सुरू असताना, अचानक १०वर्षे वयाचे शिरसचे भलेमोठे झाडकोसळले. त्याचवेळी रस्त्यानेदुचाकीवर पंकज गुप्ता हे पत्नी पूजागुप्ता व मुलगा यश यांच्यासोबतबाबानगरातील घराकडे जात होते.त्यांच्या दुचाकीवरच भलेमोठे झाडकोसळले. त्यामुळे तिघेहीदुचाकीसह झाडाखाली दाबले गेले.अवघ्या पाच मिनिटांत परिसरातीलनागरिकांनी धाव घेत झाड उचलूनतिघांना बाहेर काढले. त्यात यशच्यामांडीला मार लागून तो गंभीर जखमीझाला होता. तर त्याच्याआई-वडीलांनाही मार लागला होता.उपचारादरम्यान यशचा मृत्यू झाला.
मूळचे राजस्थानचे असणारे गुप्ताकुटुंबीय २० वर्षांपासून नांदेडशहरात राहतात. त्यांचा पाणीपुरीविक्रीचा व्यवसाय आहे. रविवारीदुपारी ते खरेदीसाठी बाहेर पडलेहोते. घरी परत येताना ही दुर्घटनाघडली. त्यात गुप्ता यांचा एकुलताएक मुलगा यश याच्यावर काळानेझडप घातली. यशच्या पश्चातआई, वडील व दोन बहीणीआहेत. मृत यश हा शहरातीलएका शाळेत इयत्ता चौथीच्यावर्गात शिकत होता, अशी माहितीशेजाऱ्यांनी दिली.झाड कोसळल्याने बालकाचे आई-वडील असे अडकले होते, त्यांना नागरिकांनी बाहेर काढले.