जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२४
राज्यातील प्रेमीवीर आपल्या प्रेमासाठी काय काय करतील हे कुणीही सांगू शकत नाही नुकतेच राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर येथील कोनवडे परिसरातील एका प्रेमवीराने एकतर्फी प्रेमातून चक्क स्मशानभूमीत करणीचा प्रकार केला आहे. या घटनेची खुमासदार चर्चा परिसरात चालू आहे. चार दिवसांपूर्वी गावातील एकाचा मृत्यू झाल्यानंतर लोक चिता रचण्यासाठी स्मशानभूमीत गेले. त्यावेळी करणीचा प्रकार उघडकीस आला.
प्रेमवीराने लिंबूवर कागद गुंडाळून त्यावर खिळा मारलेला होता. गुलाल टाकला होता. एका तरुणाने लिंबूवरील कागद काढला असता त्यावर माझ्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी, असे म्हणून मुलीचे नाव लिहिलेला मजकूर दिसला. लिंबू, मिरच्या, बिब्बा, गुलाल, खिळे याचा वापर गावातील प्रमुख मार्गांवर आणि जोड रस्त्याच्या कोपर्यांवर केल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे. असे अघोरी प्रकार करणारे आणि करायला लावणारे यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.