जळगाव मिरर / २७ एप्रिल २०२३ ।
जळगाव शहरापासून जवळ असलेले कुसुंबा येथील एकाने घराचा खिडकीचा काच फोडल्याचा शुल्लक कारणाचा जाब विचारल्याचा राग येऊन अनिल गोरख सैंदाणे (वय ४२) यांना लाकडी काठीने डोक्यावर मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजता कुसुंबा येथे घडली. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १० वाजता अनिल सैंदाणे यांनी गावातील एका व्यक्तीला घराचा खिडकीचा काच फोडल्याचा जाब विचारला. त्याचा राग येऊन त्या व्यक्तीने लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर आणि पायाला मारहाण केली. डोक्यावर दुखापत झाल्यामुळे त्यांना रक्तस्राव होऊ लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. डोक्यावर सहा तर पायाला दोन टाके पडले असून उपचार घेतल्यानंतर बुधवारी त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास गफूर तडवी हे करीत आहेत.