जळगाव मिरर / १ मार्च २०२३ ।
देशात सध्या महागाईच्या भडक्यात होरपळून निघत असतांना सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक चटका बसला आहे. यामध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली असून 14.21 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये झाली आहे. यापूर्वी 6 जुलै 2022 रोजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करून ती 1053 रुपयांपर्यंत वाढवली होती. त्याचबरोबर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही वाढ झाली असून त्याची किंमत तब्बल 350.50 रुपयांनी वाढली आहे.
होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळा बसल्या असून घरी स्वयंपाक करून जेवणे आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणे हे दोन्ही आता महागले आहेत. परिणामी तुम्ही जर सबसिडी घेतली असेल तर घरगुती गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना दरवर्षी 14.2 किलो वजनाचे 12 सिलेंडर सबसिडाइज्ड रेटमध्ये अर्थात सवलतीच्या दरात मिळतील. तर अतिरिक्त सिलेंडरसाठी घरगुती वापराच्या सिलेंडरचे नवे दर लागू होणार आहेत.
शहर मार्च 2023 फेब्रुवारी 2023
संभाजीनगर 1,111.50 1,061.50
भंडारा 1,163.00 1,113.00
बीड 1,128.50 1,078.50
बुलढाणा 1,117.50 1,067.50
चंद्रपूर 1,151.50 1,101.50
धुळे 1,123.00 1,073.00
गडचिरोली 1,172.50 1,122.50
गोदिंया 1,171.50 1,121.50
बृहन्मुंबई 1,102.50 1,052.50
हिंगोली 1,128.50 1,078.50
जळगाव 1,108.50 1,058.50
जालना 1,111.50 1,061.50
याआधी 1 जुलै 2022 ला घरगुती सिलिंडरच्या किमती बदलल्या होत्या. त्यानंतर आज 1 मार्च 2023 पासून घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी 1 एप्रिल 2017 ते 6 जुलै 2022 याकालावधीत एलपीजीच्या किमती 58 वेळा बदलण्यात आल्या आहेत. म्हणजेच एलपीजी सिलिंडरच्या दरात 45 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. एप्रिल 2017 मध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 723 रुपये होती तर जुलै 2022 पर्यंत त्यात 45% वाढ होऊन किमती 1053 रुपयांवर पोहोचल्या.
