जळगाव मिरर | ७ नोव्हेंबर २०२४
महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा नुकताच शहरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्रभाग एक आणि दोन मध्ये प्रचंड असा प्रतिसाद त्यांना मिळाला, प्रभागातील विकास कामांमुळे जनतेकडून मोठी दाद त्यांना मिळाली.
सुरवातीला अनिल पाटील यांनी धुळे रोडवरील भाजपचे दिवंगत नेते स्वर्गीय उदय बापू वाघ यांच्या स्मारक स्थळी माल्यार्पण व अभिवादन केले,यावेळी भाजयुमो प्रदेश चिटणीस भैरवी वाघ पलांडे याही उपस्थित होत्या.त्यानंतर प्रभाग एक व दोन मध्ये सानेनगर, तांबेपुरा, बंगाली फाईल,ख्वाजा नगर,समता नगर,रामवाडी,केशव नगर आदी परिसरात ढोल ताश्यांच्या गजरात रॅली काढण्यात आली.रॅली दरम्यान विविध देवस्थानाना भेटी देऊन आशीर्वाद घेतले.तसेच अनेक ठिकाणी महिला भगिनींनी अनिल पाटील यांचे औक्षण केले तर जेष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिलेत.
यावेळी तरुणांचा मोठा उत्साह व प्रतिसाद दिसून आला.यावेळी प्रभागातील माजी नगरसेवकांनी बोलताना सांगितले की प्रभाग क्रमांक एक बंगाली फाईल केशव नगर परिसरात सर्वात महत्वाचा रेल्वे उड्डाण पूल ते तांबेपुरास जोडणारा रस्ता अनिलं दादांनी पावणे तीन कोटी निधी आणून मंजूर केल्याने मोठा प्रश्न सुटला असून यामुळे विप्रो कंपनीची देखील मोठी सोय झाली आहे,याच रस्त्यावर 75 लक्ष निधीतून जम्बो लाईट देखील लागणार आहेत,याशिवाय इतर लहान मोठे कामे दादांनी दिल्याने विकास साधला गेला आहे.तसेच सानेनगर परिसरात सर्वात महत्वाचा प्रश्न बोरी नदीवरील पुलाचा त्यासाठी देखील पाच कोटी अनिल दादांनी मंजूर केल्याने या परिसरातील शेतकरी बांधवांना पलीकडे शेतात जाण्याची मोठी सोय झाली आहे.या दोन्ही प्रभागासह शहरात देखील विकासाची गंगा त्यानी आणल्याने आमचा संपूर्ण परिसर 100 टक्के अनिल दादांच्या पाठीशी असल्याचे माजी नगरसेवक सह अनेकांनी बोलून दाखविले. यावेळी महायुती तील भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी कार्यकर्तेसह दोन्ही प्रभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.