जळगाव मिरर | २१ सप्टेंबर २०२४
धरणगाव तालुक्यातील भोणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे उद्घाटन आज स्वच्छता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
भोणे गावातील जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे आज गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गावून गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर गुलाबराव पाटील यांचा मुख्याध्यापक दिलीप कुंभार उपशिक्षक लक्ष्मण पाटील यांनी सत्कार केला. यावेळी तालुक्यातून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले दिलीप कुंभार यांचा सत्कार गुलाबराव पाटील यांनी केला. तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी. ओ. पाटील, मोती अप्पा पाटील, रोटवदचे माजी सरपंच मोहन शिंदे, शिवसेना विभागप्रमुख समाधान पाटील, सरपंच संगीताबाई पाटील, उपसरपंच भालचंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य निंबा पवार, मकरध्वज पवार, योगेश पाटील, समाधान पाटील, राहुल पाटील, रावसाहेब पाटील, दिनेश पाटील, दीपक पाटील, अमोल पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक व गावकरी उपस्थित होते.