जळगाव मिरर | ७ नोव्हेंबर २०२५
मराठा समाजासाठी नेहमीच आरक्षणाबाबतची आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच एक गंभीर आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तर मला ठार मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. आज ही वेळ माझ्यावर आली आहे, उद्या इतर नेत्यावरही येईल त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. माझ्यासह इतर अनेक नेत्याबद्दल संशयित आरोपींकडे माहिती आहे, त्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. जो व्यक्ती स्वत:च्या बहिणीविषयी वाईट बोलू शकतो अशी प्रवृत्ती राजकारणातून संपवली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.
माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. बीडचा कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे, धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात हे षड्यंत्र रचण्याचे काम केले आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचे आहे. कारण वेळ तुमच्यावरही येणार आहे. माझे तुमचे मतभेद असले तरी हा विषय गंभीर आहे. करणाऱ्यापेक्षा करुण घेणारा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे असे मी मानतो.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अशा वृत्तीचा आपल्याला नाय नाट करावा लागेल. आरक्षण, राजकारण हा विषय वेगळा आहे. पण जीवावर उठणे हा विषय खूप गंभीर आहे. आपण जर सावध नसतो तर यांचा बाप ठरलो नसतो असे जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, बीडच्या कार्यकर्त्याने संशयित आरोपींना सोबत परळीला नेल. मुंडेंनी त्यांच्यासाठी बैठक सोडली आणि या दोघांची भेट घेतली. मग यांचे 2 कोटी रुपयांमध्ये हे ठरले आणि 50 लाख रुपये असे ठरले. यापूर्वी त्यांनी 6 कोटी रुपये असेच नासवले आहे. यानंतर त्यांचे घातपाताचे सुरू केले. धनंजय मुंडे यांनी हे करायला सांगितले हे या आरोपींना माहिती आहे. काहीच जमले नाही तेव्हा संभाजीनगरच्या झाल्टा फाट्यावर धनंजय मुंडे या आरोपींची वाट पाहत थांबले. हे खरं आहे की खोटे आहे. हे तुम्ही शोधा. त्यावेळी त्यांनी तिथे चर्चा केली मी तुम्हाला गोळी औषधे देतो. हे आरोपी भाऊबीजेच्या दिवशी त्यांना भेटले, आंतरवालीमधील बडे नावाचा कुणीतरी यामध्ये सहभागी आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, काहीच जमले नाही तेव्हा तुम्ही मला गाडी घेऊन द्या आम्ही गाडीने त्यांना ठोकतो तेव्हा धनंजस मुंडे आरोपींना म्हणाला की नवी गाडी घेऊन देण्यापेक्षा पर राज्यातील पासिंगची गाडी घेऊन देतो आणि तुमचे चालू द्या. या सर्वच्या पाठीमागे धनंजय मुंडे आहे. अशाने राजकारण होत नसते. घात पात करत खून करत राजकारणात कुणी मोठे होऊ शकत नाही. गोपीनाथ मुंडे यांनी असे राजकारण केले नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण हे लोकं नीच आहे. आम्ही रेकॉर्डिंग ऐकूण परेशान झालो आहोत. दोन्ही आरोपींना सर्व काही माहिती आहे. पंकजा मुंडेंचा काय विषय आहे हे त्यांना माहिती आहे. बावनकुळे यांच्या भाच्याबद्दल काय विषय आहे हे देखील त्यांना माहिती आहे. कारच्या सीट खाली मोबाईल ठेवत हे सर्व रेकॉडिंग सुरू आहे. ही नासकी टोळी केवळ राजकारण करत आहे. गाडी धुणारा जीपीएस लावत होता. धनंजय मुंडे हा माणूस खूप डेंजर आहे. त्यांच्याकडे अनेक नेत्यांबद्दल माहिती आहे. त्यांना जातीशी काही देणं घेणं नाही.



















