जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२४
जळगाव शहरातील जोशी कॉलनीत असलेल्या गुरू गोरक्षनाथ मंदिरात सत्य नारायणाची महापूजा व भव्य भागवत ग्रंथाच्या मिरवणुकीने गुरुवार दिनांक २६ रोजी श्रीमद् भागवत कथेला सुरुवात झाली.
गुरू गोरक्षनाथ मंदिरातून टाळ, मृदुंग व हलगीच्या सुरात मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी सडा रांगोळ्यांनी परिसर सजला होता. यावेळी प्रवक्ते ह.भ.प.मनोजचंद्र महाराज, वृंदावन, ज्येष्ठ समाजसेवक, पंच आनंदा फकिरा जोशी यांच्यासह समाजातील, पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.
२६ रोजीपासून दररोज दुपारी १.३० ते ५ वाजेपर्यंत कथा, हरिपाठ सायंकाळी ६ ते ७ तर रात्री ८ वाजेपासुन कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. २ जानेवारी रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता होणार आहे. दरम्यान २६ रोजी गुरुवारी सर्वश्री ह.भ.प. राहुल महाराज धरणगाव, शुक्रवारी गजानन महाराज वरसडेकर, शनिवार मालतीताई टीटगावकर, रविवारी महामंडलेश्वर सूर्यभान महाराज, शेळगाव, सोमवारी मुकेश महाराज पारगावकर, मंगळवार श्रीराम महाराज, श्रीराम मंदिर संस्थान जळगाव, बुधवार संजय महाराज कासोदा, दुपारी ४ वां. मिरवणूक तर २ जानेवारी रोजी मनोजचंद्र महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होणार आहे.तरी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.