जळगाव मिरर | ४ जुलै २०२५
पक्षाचे सामान्यांना केंद्रबिंदू मानून राबविण्यात येणारे धोरण, सरकारमध्ये सहभागी असल्याने देण्यात येणाऱ्या योजनांची जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत अंमलबजावणी करून विशेषत: युवतींमध्ये जनाधार वाढविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष पदावर कु.भाग्यश्री विवेक ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव येथे गुरुवार,३ जुलै रोजी झालेल्या आढावा बैठकीला उपस्थित असलेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अँड.संध्या सोनवणे यांच्या संमतीने,महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री व पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी आ.अनिल पाटील,पक्षाचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण,माजी पालकमंत्री डॉ.सतिष पाटील व गुलाबराव देवकर रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार व महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या विशेष उपस्थितीत भाग्यश्री ठाकरे यांना पत्र देत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
सर्वस्तरातून झाले स्वागत –
आ.कैलास पाटील,दिलीपतात्या सोनवणे,प्रदेश सरचिटणीस लतिफजी तांबोळी, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी कदम, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, प्रदेश सरचिटणीस व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रविंद्र पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, जळगाव शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील,युवतीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक अभिलाषा रोकडे, महिला शहराध्यक्षा मीनलताई पाटील,युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे,रावेर लोकसभा युवक अध्यक्ष अरविंद चितोडिया,महिला कार्याध्यक्षा लता राठोड,युवती काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी,विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार,कार्याध्यक्ष अश्विन सुरवाडे यांनी या नियुक्तीचे स्वागत करून अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
अन,संध्याताई भारावल्या…!
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अँड.संध्याताई सोनवणे यांची पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजच्या विद्यार्थी सचिव,जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतच्या सदस्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत त्यांची वाटचाल अत्यंत बोलक्या व सुरेख पद्धतीने मांडलेली एक फोटोफ्रेम यावेळी उपस्थित सर्व युवतींनी संध्या सोनवणे यांना भेट स्वरूपात दिली. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष कु.भाग्यश्री ठाकरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेली ही भेट पाहून संध्याताई सोनवणे या अक्षरशः भारावल्या,त्यांनी माझ्या जीवनाच्या वाटचालीचे वर्णन करणारी ही भेट मी काळजीपूर्वक जपून ठेवीन असे यावेळी नमूद केले.
कल्पक व आत्मविश्वासू युवतीची नियुक्ती झाल्याच्या भावना –
कु.भाग्यश्री ठाकरे जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात सर्वांना परिचित विवेक ठाकरे यांची कन्या असून राजकीय व सामाजिक कार्याचे बाळकडू तीला जन्मजात घरातूनच मिळाले असल्याने ग्रामगौरव मीडिया फौंडेशनच्या माध्यमातून तीच्या कल्पक व धडाकेबाज कामाच्या जोरावर एका आत्मविश्वासू युवतीला पक्षाने संधी दिल्याची भावना पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष व माजी आमदार मनिषदादा जैन यांनी व्यक्त केली.
❝शिव,शाहू,फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर आणि पुरोगामी महाराष्ट्राची रेषा अधिक मोठी करण्याच्या उद्देशाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या परखड विचाराची व स्वयंस्पष्ट धोरणाची मी आधीपासूनच चाहती आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अगदी पहिला वर्ग म्हटला जाईल पण मुळात खूप काही शिकता येणाऱ्या व अनुभव देणाऱ्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली असल्याने आनंद आहे.तरीही पक्षामधील सर्वांच्या मार्गदर्शनाने सामान्यांना केंद्रबिंदू आणि विशेषत: युवतींसाठी नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून एक प्रभावी काम उभे करण्याचा माझा मनोदय आहे. ❞
भाग्यश्री विवेक ठाकरे
जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी युवती काँग्रेस रावेर लोकसभा
