जळगाव मिरर / १४ एप्रिल २०२३ ।
भारतरत्न, महामानव, घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज जळगावातील रेल्वे स्टेशन परिसरातील स्मारकावर आदरांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष मनिषा पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेतील कार्याचा उल्लेख केला. या प्रसंगी त्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी सौ मनिषा पाटील मंदाताई सोनवणे,नेहा जगताप ,संगीता चौधरी, भाग्यश्री महाजन, नीता विसावे ,योगिता बाविस्कर ,आशा मौर्य , मोक्षदा चौधरी, यासह सर्व नारीशक्ती बहुद्देशीय संस्था महिला भगिनी व पदाधिकारी उपस्थित होत्या.




















