अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातून तरुणाची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील प्रसाद अनिल बोरसे (वय २७) यांच्या मालकीची दुचाकी त्यांनी धुळे रोडवरील एका दवाखान्याच्या बाहेर लावलेली दुचाकी क्रमांक एम.एच.१९.डी.एल ३९६३ सुमारे २० हजार रुपये किमतीची दुचाकी दिनांक ८ रोजीच्या दुपारी अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रसाद अनिल बोरसे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेको. सुनील हटकर हे करीत आहे.