• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

RBI चा मोठा निर्णय : आता गुगल पे व फोन पेमध्ये पैसे नसतानाही खर्च करता येणार पैसे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 6, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, व्यवसाय, सरकारी योजना
0
RBI चा मोठा निर्णय : आता गुगल पे व फोन पेमध्ये पैसे नसतानाही खर्च करता येणार पैसे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ६ एप्रिल २०२३ ।

देशात गेल्या काही वर्षापासून प्रत्येक व्यवहार युपिआयद्वारे होवू लागले आहे. त्यामुळे सरकारने अनेक निर्णय जनतेला दिलासा देणारे घेतले असून आता यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सारखे ऑप्शन अधिक आकर्षक बनवण्यासाठी मोठी घोषणा केली. चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर गव्हर्नर म्हणाले की, आता UPI वर सुद्धा युजर्सला क्रेडिट कार्ड सारखी सुविधाही मिळेल. पूर्व-मंजूर रक्कम बँकांकडून युजर्सना दिली जाईल, जी खात्यात पैसे नसतानाही वापरली जाऊ शकते.

गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, देशात UPI च्या माध्यमातून होणारे व्यवहार वेगाने वाढत आहेत. ते लोकांमध्ये अधिक लोकप्रिय करण्यासाठी आणि युजर्सना अधिक सुविधा देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. Paytm, PhonePe किंवा Google Pay सारख्या अॅप्सद्वारे UPI पेमेंट करणाऱ्या युजर्सना आता पूर्व-मंजूर क्रेडिट लाइन दिली जाईल. ही रक्कम बँका किंवा वित्तीय संस्था ठरवतील. युजर्स आपल्या खात्यात पैसे नसतानाही ही रक्कम वापरू शकतील. तसेच, आरबीआयच्या या उपक्रमामुळे इनोव्हेशनला आणखी प्रोत्साहन मिळेल.

काय आहे क्रेडिट लाइन?
क्रेडिट लाइन ही बँकेद्वारे युजर्ससाठी सेट केलेली मर्यादा असणार आहे. युजर्स खर्च करू शकणारी रक्कम असणार आहे. बँका आणि वित्तीय संस्था युजर्सचे उत्पन्न आणि कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करून ही क्रेडिट लाइन तयार करतील. एक प्रकारे UPI वर ओव्हरड्राफ्ट सारखी सुविधा देखील दिली जाईल. जिथे युजर्स गरजेनुसार ही रक्कम वापरेल आणि नंतर ही रक्कम व्याजासह परत करेल. दरम्यान, या सुविधेच्या बदल्यात बँका तुमच्याकडून काही व्याज आकारतील. प्रत्येक युजर्सच्या जोखीम क्षमतेचे मूल्यांकन केल्यानंतरच बँका पूर्व-मंजूर क्रेडिट लाइन तयार करतील.

UPI ला लिंक करू शकता क्रेडिट कार्ड
गव्हर्नर म्हणाले की, आज भारतात UPI द्वारे जास्तीत जास्त पेमेंट केले जात आहे. त्यामुळे किरकोळ व्यवहार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. बँकांनी देखील UPI च्या ताकदीचा फायदा घेऊन आपली स्वतःची उत्पादने आणि फीचर्स विकसित केली आहेत. एमपीसीच्या बैठकीत क्रेडिट कार्डला UPI शी लिंक करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. सध्या, युजर्स रुपे क्रेडिट कार्डला (RuPay Credit Card) UPI शी लिंक करू शकतील.

UPI द्वारे व्यवहार वाढले
जर तुम्ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीवर नजर टाकली तर, एकूण 8.7 अब्ज व्यवहार UPI द्वारे करण्यात आले आहेत. ते वार्षिक आधारावर 60 टक्क्यांनी वाढत आहेत. जर आपण गेल्या 12 महिन्यांच्या डेटावर नजर टाकली तर दररोज सरासरी 36 कोटी व्यवहार UPI द्वारे झाले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या 24 कोटी व्यवहारांपेक्षा हा आकडा 50 टक्के अधिक आहे.

Tags: #rbi

Related Posts

जनतेला आनंदाची बातमी : विजेचे दर होणार कमी, मुख्यमंत्र्यांनी सांगितला हिशोब !
क्राईम

जनतेला आनंदाची बातमी : विजेचे दर होणार कमी, मुख्यमंत्र्यांनी सांगितला हिशोब !

June 26, 2025
स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्षे पूर्ण 37 रक्तदात्यांनी केले रक्तदान !
जळगाव

स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्षे पूर्ण 37 रक्तदात्यांनी केले रक्तदान !

June 15, 2025
पंढरपूर वारीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून मोफत औषधांचे वाटप !
जळगाव

पंढरपूर वारीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून मोफत औषधांचे वाटप !

June 15, 2025
जळगावातील शैक्षणिक क्षेत्राचा झाला ‘खेळखंडोबा’ !
जळगाव

जळगावातील शैक्षणिक क्षेत्राचा झाला ‘खेळखंडोबा’ !

June 10, 2025
जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा होणार दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर
जळगाव

जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा होणार दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 9, 2025
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय : एका क्लिकवर मिळणार प्रमाणपत्र !
क्राईम

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय : एका क्लिकवर मिळणार प्रमाणपत्र !

June 6, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group