जळगाव मिरर । २७ जानेवारी २०२३ ।
देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने आपली ओळख निर्माण करीत असतांना काही निर्णय तत्काळ भाजपने घेतले पण आता ज्या ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे. त्या त्या राज्यात सुद्धा आता वेगवेगळे निर्णय घेण्याची तयारी मुख्यमंत्री दाखवीत आहेत. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील पालकांना मोठा दिलासा देण्यार असल्याचा मोठा निर्णय ते घेण्याच्या तयारीत आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही. सरकारच्या या निर्णयामुळे प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्याथ यांनी सांगितलं होतं की, कुठल्या शाळेमध्ये दोन सख्ख्या बहिणी शिकत असतील तर एकीची फीस शालेय प्रशासनाने माफ करावी.जर शालेय प्रशासनाला फीस माफ करणं शक्य नसेल तर उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने एका बहिणीची फीस भरली जाईल.