जळगाव मिरर / १४ फेब्रुवारी २०२३ ।
दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे टाकले आहेत. या धाडी दरम्यान आधिकऱ्यानी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या छापेमारी मध्ये ५० हून अधिक आधिकरी आणि कर्मचारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली कार्यालयानंतर मुंबईत देखील आयकर विभागाने छापे टाकले आहेत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सूड भावनेने ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी बीबीसी या वृत संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरील वादग्रस्त माहितीपट प्रदर्शित केला होता. त्यानंतर आता ही छापेमारी झाली आहे.
बीबीसीच्या ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन्स ’ या डॉक्युमेंट्रीमुळे बीबीसी मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या दोन भागांच्या डॉक्युमेंट्री मालिकेवर देशभरातूनही तिखट प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. गुजरातमधील २००२ च्या दंगलींवर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (बीबीसी) बनविलेला माहितीपट म्हणजे निव्वळ “दुप्रप्रचाराचा हिस्सा” आहे, अशा शब्दांत भारत सरकारने डॉक्युमेंट्रीवर ताशेरे ओढले होते. तसेच बीबीसीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली.
इंडिया -द मोदी क्वेश्चन्स ` या माहितीपटाबद्दल ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर (बीबीसी) भारतात पुन्हा संपूर्ण बंदी घालण्याची हिंदू सेनेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली होती. ही याचिका पूर्णपणे चुकीची असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
`आम्ही असा आदेश कसा देऊ शकतो ?` असा सवाल करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या एम एम सुंदरेश यांच्या खंडपीठाने, या याचिकेत आवश्यक ती योग्यता नसल्याचे सांगत ती फेटाळून लावली. आता या प्रकरणाची सुनावणी एप्रिलमध्ये होणार आहे.