• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आताची मोठी बातमी ! ठाकरे गटाच्या हातात ‘धगधगती मशाल’ तर शिंदे गटाला मिळाले नाव

तर शिंदे गटाला मंगळवारी सकाळी १० पर्यंतची मुदत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
आताची मोठी बातमी ! ठाकरे गटाच्या हातात ‘धगधगती मशाल’ तर शिंदे गटाला मिळाले नाव
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० ऑक्टोबर २०२२

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व शिंदे गटाने निवडणूक चिन्ह म्हणून मागणी केलेले त्रिशूळ व गदा ही दोन्ही चिन्हे बाद ठरवली आहेत. यासाठी आयोगाने ही चिन्हे धार्मिक प्रतीके असल्याचा दाखला दिला आहे. आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिले आहे. आयोगाने शिंदे गटाला मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत निवडणूक चिन्हासाठी नवे पर्याय सादर करण्याचे निर्देशही दिलेत. त्यामुळे शिंदे गटाला कोणते चिन्ह मिळते याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे.

निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यात त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संभाव्य निवडणूक चिन्हांची व पक्षाच्या नावाचीही माहिती दिली होती.

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आणि शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगाने आज याबद्दलचा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव देण्यात आले आहे. यासोबतच एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान अद्याप शिंदे गटाला कोणतेही चिन्ह मिळालं नाहीये. आयोगाकडून नवीन तीन चिन्हे सूचवा असे शिंदे गटाला सांगण्यात आले आहे.

रविवारी सायंकाळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पर्यायी नावं आणि चिन्हंदेखील त्यांनी दाखवून दिले होते. त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल या चिन्हांचे फोटो उद्धव ठाकरेंनी दाखवले होते. शिवाय नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पर्यायी नावं निवडणूक आयोगाला दिली होती.

तसेच निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले होते यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला होता. शिंदे गटाने बंड केल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले होते. यापैकी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळालं आहे. शिंदे गटाला तीन नवीन चिन्ह सादर करावे लागणार आहेत, उद्या सकाळी १० वाजेपर्यंत सादर करायचे आहेत. शिंदे गटाने त्रिशुळ, उगवता सुर्य आणि गदा हे चिन्ह निवडणूक आयोगाला सादर केले होते. दुसरीकडे ठाकरे गटाने त्रिशुळ, उगवता सुर्य आणि मशाल हे चिन्ह सादर केले होते. दरम्यान निवडणूक आयोगाने दोनही गटाची धार्मिक चिन्ह रद्द केली होती.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group