जळगाव मिरर | २६ नोव्हेबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीच्या हाती सत्ता दिली असून महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. तर आज दि.२६ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार असून या निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशात महायुतीमधून भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजूरी दिली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही या निर्णयला होकार दिला असल्याचे समजते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दि.२५ रोजी संध्याकाळी दिल्लीत शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यासमवेत सत्तावाटपाचा तपशील आणि मंत्रिमंडळ रचना यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली असून त्यानंतर घोषणा अपेक्षित आहे.