जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून महामार्गावर अपघाताची मालिका नियमित सुरु आहे. यात बस आणि दुचाकी अपघातात एकजण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना पाल- मोरव्हाल रस्त्यावर बुधवारी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात विठ्ठल रामसिंग भील (वय ५०, रा. मोरव्हाल, जि. खरगोन) यांचा मृत्यू झाला. बबलू ऐसिंग भील (३०), सुनील सुभाष भील (२५) हे दोघे गंभीर जखमी झाले असून दोघांवर फैजपूर येथील रुग्णालयात उपचार सरू आहे. बधवारी रावेर आगाराची बस पालहून रावेरसाठी निघाली होती. सकाळी १० वाजेच्या दरम्यान पालपासून दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. दुचाकीवरील तिघे अपघातानंतर रस्त्यावर जोरदार आदळले. रामसिंग भिल हा जागीच ठार झाला. घटनास्थळी पाल चौकीचे पोलिस नाईक विष्णू भिल, प्रदीप सपकाळे, मुकेश मेढे हे दाखल झाले व मदतकार्य केले. अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.