अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील एका परिसरातून एकाची दुचाकी लंपास झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दुचाकी मालकाने अमळनेर पोलिसात धाव घेत तक्रार दिली असून या प्रकरणी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील श्री संत सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिणी मंदिर परिसरात कसली मोहल्लाकडे जाणार्या सार्वजनिक जागी रवींद्र बडगुजर वय ४७ रा. गळवाडे ता. अमळनेर यांच्या मालकीची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एम एच १९ ए बी ७५५४ हि ४ मे रोजी लावलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ती शोधूनही सापडली नसल्याने रवींद्र बडगुजर यांनी ६ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रमोद पाटील करीत आहे.