जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यावर येवून ठेपल्या आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला देखील लागले आहेत. यामध्ये यात्रा, सभा आणि आंदोलनाचा मोठा धूम धडाका सुरु असून थेट जनतेत जाऊन ब्रँडिंग करण्याची एक देखील संधी राजकीय पक्ष सोडताना दिसत नाही. यावेळी भाजपला संघाचे बळ मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपबाबत संघाने तटस्थ भूमिका घेतली होती. झारखंड येथील पक्ष मेळाव्यात जे.पी. नड्डा यांनी केलेल्या विधानाची ही प्रतिक्रिया होती. पण विधानसभेसाठी भाजप-संघात दिलजमाई झाली आहे. विधानसभा काबीज करण्यासाठी संघाने भाजपला तंत्र आणि मंत्र दिला आहे.
लोकसभा निवडणूक एक हाती जिंकण्याचा भाजपचा विश्वास होता. पण काही राज्यात त्यांना जबरदस्त फटका बसला. त्यानंतर भाजपने संघाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात यश आले. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री राजनाथ सिंह, अमित शाह आणि संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सहकार्यवाह अरुण कुमार, संघटना महासचिव बी. एल. संतोष यांच्यात दिल्लीत एक बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सध्याच्या नेतृत्वासोबतच नवीन चेहऱ्यांना पण निवडणूक प्रचारात उतरवण्याची आग्रही मागणी संघाने भाजपकडे केली आहे. नवीन चेहरामुळे वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती दिली आहे. पण आता भाजपने या प्रक्रियेत हस्तक्षेप करत स्थानिक नेतृत्वासह नवीन चेहऱ्यांना पण संधी देण्याची आग्रही मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निवडणूक प्रक्रियेत भाजप आणि संघात बैठका होतात. पण या लोकसभेवेळी भाजप-संघात अशी बैठक झाल्याचे दिसून आले नाही. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने विधानसभेसाठी भाजप-संघात समन्वयाची सुरुवात झाली. त्यानुसार गेल्या आठवड्यात दिल्लीत भाजप-संघात बैठकांचे सत्र सुरु झाले. त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत संघ संघटनात्मक दृष्ट्या पण सक्रिय भूमिका बजावण्याची शक्यता आहे.