
जळगाव मिरर | १० मार्च २०२६
बोदवड तालुक्यातील रेवती येथील शेतशिवारात सोमवारी सकाळी निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीची ओळख शेलवड येथील उत्तम मधुकर माळी (वय ४५) अशी पटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम माळी हे दि. ६ पासून घरातून बेपत्ता होते. सोमवारी सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास रेवती येथील भरत पाटील यांच्या शेतशिवारात निंबाच्या झाडाला एक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर तो शेलवड येथील बेपत्ता असलेले उत्तम माळी यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी एकनाथ हरी माळी (रा. शेलवड) यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















