• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जगात ‘बोको हराम’ संघटना, महाराष्ट्रात ‘खोके हराम’ शिवसेनेची शिंदे गटावर जहरी टीका

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 27, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दैनिक सामनाच्या मुख्य संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली आहे. त्यात बोकेही आहेत आणि खोकेही, आहेत अशा शब्दात शिवसेनेने शिंदे गटावर जहरी टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे.

राज्यात यंदा पाऊसही तुफान झाला आहे, पण विरोधकांनी मागणी करूनही सरकार ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. येथे सर्व सत्ताभोगी असून जनहिताच्या बाबतीत त्यांच्या अकलेचाच दुष्काळ पडला आहे. हा अकलेचा दुष्काळ शेवटचे दोन दिवस सभागृहातून विधानसभेच्या पायऱ्यांवर आला असल्याचे शिवसेनेने म्हटले. शिवसेनेने म्हटले की, विधीमंडळ अधिवेशनात खोकेछाप शिंदे गटाचा खरा चेहरा उघड झाला. पूर्वी तालेवार लोकांना रावसाहेब, रावबहादूर वगैरे उपाध्या लावल्या जात. पण शिंदे गटाच्या लोकांपुढे म्हणजे त्यांनी चोरलेले जे आमदार वगैरे मंडळी आहेत, त्यांच्या आडनावापुढे यापुढे वंशपरंपरेने ‘खोकेवाले’ ही उपाधी लागेल. अगदी सहज सोप्या भाषेत हा विषय समजवायचा तर ‘दिवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन याच्या हातावर कोरले होते, ‘मेरा बाप चोर है!’ त्याच पद्धतीने या चोरांच्या पुढच्या पिढीच्या कपाळावर कोरले जाईल, ‘मेरा बाप, भाई, आजोबा खोकेवाला था! आणि त्याने महाराष्ट्राशी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली!’ हा शिक्का पुसता येणे कठीण असल्याचे शिवसेनेने म्हटले. ही सल मनात टोचत असल्यामुळेच दोन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार सभागृह सोडून विधानसभेच्या पायऱयांवर बसले व आम्ही ‘खोकेवाले नाही. आम्हाला खोकेवाले म्हणू नका’ असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहिले असल्याचे ‘सामना’ने म्हटले.

विधिमंडळाच्या पायऱयांवर बसलेल्या खोका आमदारांचे हे विचित्र चाळे मुख्यमंत्री स्वतः पाहत होते व त्यांनी या आमदारांना भल्याच्या चार गोष्टी सांगितल्या नाहीत. कारण आडातच नाही तेथे पोहोऱ्यात कोठून येणार? हाच प्रश्न आहे. त्या खोका आमदारांचा माकडखेळ पाहत आपले मुख्यमंत्री उभे राहिले व खोकेवाल्यांची कहाणी सफल झाली असल्याचा टोला शिवसेनेने लगावला. महाराष्ट्रात व बाहेर जेथे जावे तेथे लोक खोकेवाल्यांच्या नावाने बोंब मारीत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, ‘महाराष्ट्रातील खोक्यांचा फॉर्म्युला वापरून ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे.’ म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱयांवर बसलेल्या खोकेवाल्यांचा उद्धार झालाच. बिहारात राजद-जदयुचे नेते जाहीरपणे बोलत आहेत, ‘महाराष्ट्र में जो खोकेवाली राजनीती हुई, वो बिहार में फेल हो गयी!’ पायरीवरच्या खोकेवाल्यांनी हे नीट समजून घ्यावे. सर्वत्र खोकेवाल्यांचीच धामधूम आहे. गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे. महाराष्ट्राला हा कलंकच लागला म्हणायचा असेही शिवसेनेने म्हटले.

Related Posts

जळगावच्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार 2025 जाहीर
जळगाव

जळगावच्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार 2025 जाहीर

May 18, 2025
लग्न लावून घरी येत असतांना भीषण अपघात : नवरदेवाच्या भावासह चार ठार !
क्राईम

लग्न लावून घरी येत असतांना भीषण अपघात : नवरदेवाच्या भावासह चार ठार !

May 18, 2025
एडवोकेट सौ.सीमा पाटील (जाधव)यांची नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती !
जळगाव

एडवोकेट सौ.सीमा पाटील (जाधव)यांची नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती !

May 18, 2025
जळगाव मनपाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात !
क्राईम

जळगाव मनपाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

May 18, 2025
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याने दोन गटांत हाणामारी !

May 18, 2025
मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली : एक ठार तर तीन जखमी !
क्राईम

मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली : एक ठार तर तीन जखमी !

May 18, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हैदराबादमध्ये लागलेल्या भीषण आगीत १७ ठार !

हैदराबादमध्ये लागलेल्या भीषण आगीत १७ ठार !

May 18, 2025
जळगावच्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार 2025 जाहीर

जळगावच्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार 2025 जाहीर

May 18, 2025
लग्न लावून घरी येत असतांना भीषण अपघात : नवरदेवाच्या भावासह चार ठार !

लग्न लावून घरी येत असतांना भीषण अपघात : नवरदेवाच्या भावासह चार ठार !

May 18, 2025
एडवोकेट सौ.सीमा पाटील (जाधव)यांची नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती !

एडवोकेट सौ.सीमा पाटील (जाधव)यांची नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती !

May 18, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group