जळगाव मिरर | १३ जुलै २०२३
राज्यातील नाशिक जिल्ह्यातील वणी घाटात बस दरीत कोसळल्याची घटना ताजी असतांना आज पहाटेच्या सुमारास कल्याण येथून भीमाशंकरला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला आंबेगाव तालुक्यातील गीरवली येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
येथील स्मशानभूमी जवळ असणाऱ्या ओढ्यावरील पुलावरून वीस फूट खोल ओढ्यात बस कोसळून अपघात झाला असून या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. काही प्रवाशांना किरकोळ मार लागल्याची माहीती आहे.
सदर गाडीमध्ये एकूण 35 प्रवासी होते. त्यापैकी दोघांना थोडीशी दुखापत झाली असून बाकी सर्व सुखरूप आहेत. घटनास्थळी पाच रूग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.