जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२३
राज्याच्या राजकारणात शिवसेनेला बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी सोबत एकत्र येत सत्ता स्थापन करीत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. यानंतर भारतीय जनता पार्टी व शिंदे गट यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीत मोठा सामना रंगला असताना भाजपातर्फे अनेक आरोप ठाकरे गटावर करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबईतील कथित सेंटर कोविड घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोर पेडणेकर यांच्या अडचणीत आता वाढ झाल्या आहेत. अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबईतील आगरी पाडा पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली असली तरी किशोर पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात बॉडी बॅग खरेदीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर ठेवण्यात आला होता या घोटाळ्यात कोट्यावधी रुपयाचा घोटाळा असल्याचे देखील समोर आले आहे कोविड काळात मुंबईत काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे अंमलबजावणी संचालनाने म्हणणं आहे यात किशोरी पेडणेकर यांचा देखील सहभाग होता त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची ही चौकशी होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.