जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे तर दुसरीकडे नुकतीच महायुतीतील भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत अनेकांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार सुरेश (राजू मामा) भोळे यांना पुन्हा संधी भाजपने दिली तर भुसावळ मतदार संघासाठी संजय वामन सावकारे यांची उमेदवारी फायनल झाली आहे. तर चाळीसगाव मतदारसंघात मंगेश चव्हाण, जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी गिरीश महाजन यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर झाले आहे.
शिरपूरमधून काशीराम पावरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर अमोल जावळे यांना रावेर, संजय सावकारे यांना भुसावळ, सुरशे भोळे यांना जळगाव, मंगेश चव्हाण यांना पुन्हा एकदा चाळीसगावातून, गिरीश महाजन यांना जामनेर, आकाश फुंडकर यांना खामगाव, संजय कुटे यांना जळगाव (जामोद), रणधीर सावरकर यांना अकोला पूर्व, प्रताप अडसद यांना धामगाव रेल्वे, प्रवीण तायडे यांना अचलपूर, राजेश बकाणे यांना देवळी, समीर कुणावर यांना हिंगणाघाट, तर डोंबिवलीमधून रविंद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.