
जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२३
गेल्या काही महिन्यापासून समृद्धी महामार्गवर होणाऱ्या अपघाताची मालिका नियमित सुरु असतांना पुन्हा या अपघातात वाढ झाली आहे. या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात आजवर शेकडो प्रवाशांनी जीव गमवला आहे. आता केमिकल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.
समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग.
आगीत ट्रक जळुन खाक , महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली.#buldhana #accident #Samruddhimahamarg #SamruddhiExpressway #buldhananews #viralvideo pic.twitter.com/wMYGYtTQBU
— Satish Daud Patil (@Satish_Daud) August 4, 2023
मिळालेल्या माहितीनुसार , नाशिकहून नागपूरच्या दिशेने निघालेल्या ट्रकचा बुलढाण्यातील मेहकरजवळ अचानक समोरील टायर फुटला. त्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन डिव्हायडरला जाऊन धडकला. या अपघातात ट्रकला अचानक आग लागली.या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. ट्रकचालक आणि वाहकाने वेळेवर ट्रकबाहेर उडी घेतल्याने सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.






















