जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२५
जळगाव तालुक्यातील धोबी वराड ते वावडदा रस्त्यावरील सुभाष वाडी परिसरात एका बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास गोऱ्हावर हल्ला करत ठार केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धोबी वराड ते वावडडा रस्त्यानजीक असलेल्या शेत रस्त्यावरील सुभाष वाडी शिवार परिसरात दिनांक 12 फेब्रुवारी 2024 मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास एका बिबट्याने गोविंद नाना जाधव यांच्या शेतात बांधलेल्या गोऱ्हावर हल्ला करत ठार केल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत गोविंद जाधव यांचे 25 ते 30 हजाराचे नुकसान झाले आहे. गोविंद जाधव हे सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या शेतात कामानिमित्त आले असता. त्यांना गोऱ्याचा मृतदेह दिसल्याने त्यांनी शेता आजूबाजू परिसरातील शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला. ही घटना वाऱ्याच्या वेगाने गावात पसरल्याने गावातील माजी सरपंच विकास जाधव युसुफ शहा याकुबशहा सचिन जाधव माणिक जाधव गणेश जाधव सुभाष जाधव यांच्यासह गावातील मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली होती.