जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२३
रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारने रिक्षाला व नंतर समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. यात तीन जण जखमी झाले. हा अपघात जळगाव-भुसावळ रस्त्यावर दुचाकीच्या शोरूमसमोर १५ डिसेंबर रोजी झाला. याप्रकरणी धडक देणाऱ्या कारचालकाविरुद्ध १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील तजूमल नूरमहंमद पटेल (४६) हे कारने भुसावळकडून जळगावकडे येत होते. यावेळी समोरून येणाऱ्या कारने समोरील रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात रिक्षाला धडक बसली व नंतर पटेल यांच्याही कारला धडक दिली. पटेल यांच्यासह रिक्षामधील प्रवासी नजीर शेख जलालोद्दीन व शांताराम रायभान पाटील हे जखमी झाले. यात वाहनांचेही नुकसान झाले. तजूमल पटेल यांनी एमआयडीसी पोलिसत फिर्याद दिली. धडक देणाऱ्या कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.