• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उमाळा घाटात नादुरुस्त ट्रकवर कारची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 17, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
उमाळा घाटात नादुरुस्त ट्रकवर कारची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७  जुलै २०२६

जळगाव-नेरी मार्गावरील उमाळा घाटाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला कारची भीषण धडक बसून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (१६ जुलै) सायंकाळी घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, अपघातग्रस्त ट्रकच्या मागील बाजूस लिहिलेला “One Mistake… Game Over” हा संदेश या भीषण दुर्घटनेनंतर घटनास्थळी चर्चेचा विषय ठरला.

मृतांमध्ये इस्राईल शेख इरफान (वय २१, रा. अजिंठा) आणि पंकज हरीष बैंडवाल (रा. इंदूर) यांचा समावेश आहे. तर प्रदीप ऊर्फ छोटू ओमप्रकाश परदेशी हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गिरीश योगेश चव्हाण (वय २१, रा. खेडी), गौरव राजू परदेशी (रा. इंदूर) आणि अनुज रामावत परदेशी (वय २५, रा. खेडी) हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत.

परदेशी कुटुंबातील हे तरुण बांधकाम व्यवसायाशी संबंधित असून अजिंठा परिसरातील त्यांच्या सुरू असलेल्या बांधकाम साईटकडे जाण्यासाठी ते जळगावहून एमएच-१९ ईपी-२०६६ क्रमांकाच्या कारने निघाले होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उमाळा घाटाजवळ पोहोचल्यावर रस्त्याच्या एका लेनला लागून जीजे-०४ एएक्स-२२८० क्रमांकाचा नादुरुस्त ट्रक उभा होता.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चालकाला रस्त्यावरील थांबलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने समोर अचानक वाहन दिसताच त्याने कार वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार प्रथम दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर तब्बल ५० ते ६० फूट रस्त्याबाहेर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त ट्रकला तांत्रिक बिघाड झाल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. मात्र, ट्रकचालकाने मागील बाजूस कोणतेही रिफ्लेक्टर, चेतावणी फलक किंवा बॅरिकेड्स लावले नव्हते. त्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणीही होत आहे.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना वाचविण्यासाठी मोठी धडपड केली. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना थांबवून जखमींना रुग्णालयात नेण्याची विनंती करण्यात आली. मात्र, एकाही वाहनचालकाने तत्काळ मदत करण्यास पुढाकार घेतला नाही. जवळपास अर्ध्या तासानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर जखमींना प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मृत व जखमी तरुणांच्या नातेवाइकांनी आणि मित्रांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली. एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Related Posts

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !
जळगाव

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा
जळगाव

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026
शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन
जळगाव

शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

July 17, 2026
रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन
जळगाव

रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन

July 17, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जामनेर हादरले : महिलेवर सामुहिक अत्याचार ; पोलिसात गुन्हा दाखल !

July 17, 2026
पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !

July 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026
शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

July 17, 2026
रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन

रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group