जळगाव मिरर / २२ मार्च २०२३ ।
संस्कार भारती जळगावतर्फे मराठी नववर्ष स्वागत निम्मित पाडवा पहाट महात्मा गांधी उद्यान येथे अतिशय उत्साहात साजरा झाली. या वर्षी परंपरे प्रमाणे सूर्याला अर्घ्य दान सुवासिनींनी व गुढीपूजन कन्यांनी महिलादिना निम्मित संस्कार भारती परिवारातील मातृशक्तीने केले.

सुरुवात संस्कार भारती ध्येयगीताने कार्यक्रमाची सुरुवात होऊन या गीतावर रसिका ढेपे व विप्रा तळले यांनी सुंदर नृत्य सादर केले. आणि संस्कार भारती चे कलासाधक श्री.दुष्यंत जोशी लिखित व श्री.राजेंद्र माने यांनी संगीतबद्ध केलेले गुढीपाडवा स्वागत गीत ही सादर झाले..यंदा कै.विद्याधर गोखले यांचेजन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यानिमित्त त्यांनी केलेल्या नाट्यगीत रचना आजच्या कार्यक्रमात सादर केल्या .यात गायक सर्वश्रीमोहन रावतोळे, नीलकंठ कासार , राजेंद्र माने , भूषण खैरनार, व अथर्व मुंडले यांनी गायन केले. तबला साथ प्रसन्न भुरे व हार्मोनियम साथ श्री.राजेंद्र माने यांनी केली . सूत्रसंचालन व निवेदन सौ. वैशाली पाटील यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमास सौ.गीता रावतोळे , संगीता पिंगळे ,रेखा लढे , वर्षा बऱ्हाटे , शारदा सावदेकर , सुचिता नेवे ,आशा जोशी,विद्या भंगाळे,प्रमोद जोशी,दिलीप चौधरी यांचे सहकार्य लाभले..कार्यक्रमास अध्यक्ष सुभाष महाले,चिंतामण पाटील, सुहास देशपांडे ,दुष्यंत जोशी, भागवत बऱ्हाटे,श्री सावदेकर,अनिल पाटील भरत लढे विशाखा देशमुख ,वैदही नाखरे, संपदा छापेकर इ कलासाधक आणि मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.




















