अमळनेर : प्रतिनिधी
दिनांक २६जानेवारी २०२३ रोजी बीझी बी ऍक्टिव्हिटी सेंटर , न्यू प्लॉट पेट्रोल पंप जवळ,अमळनेर यांनी बाल गोपालांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व कळावे या हेतूने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले होते. मतदान कसे करावे याकरता वैकल्पिक बूथ तयार करून त्यामध्ये बालगोपालांना मतदान कार्ड वाटण्यात आली होती व विविध कार्टून पोस्टर दर्शविण्यात आले होते.
आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करावे असे त्यांना समजावून सांगण्यात आले होते. त्यात या बालगोपालांनी अतिशय ऊस्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता. क्राफ्ट ऍक्टिव्हिटी मध्ये तिरंगा रंगाच्या बॅच स्वतः त्यांच्याकडून तयार करून घेतले होते. यामुळे त्यांच्या कला गुणांना येथे वाव मिळाला. त्यानंतर ट्रेपूलाईन जम्पचाही बाल गोपालांनी आनंद घेतला. शेवटी सर्वांनी फराळाच्या आनंद घेतला. अशी माहिती बीझी बी च्या संचालिका सौ निसरीन ताहा बुकवाला कळवितात.