जळगाव मिरर / १९ एप्रिल २०२३ ।
शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 19 एप्रिल 2023 सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत क्षत्रिय मराठा समाज मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिर तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संतोष पाटील, भगवान सोनवणे, योगेश कदम, विनायक पाटील, अमर राजपूत, हर्षल कोरडे, नरेंद्र शिंदे, जयेश इंगोले, सुनील अनपट, शुभम रोकडे, लखन मराठे, किसन तिवारी, धनंजय कडारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.