
जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२४
कर्जाद येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्ष अंतर्गत येणाऱ्या अहिरवाडी गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवली होती. यात तीन जण वीज चोरी करताना आढळले होते. या तिघांना चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून नोटीस दिली होती. मात्र, या तिघांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध सोमवारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये सुनील रामदास महाजन, सीताराम तुकाराम महाजन व रामचंद्र जगन्नाथ सुतार यांचा समावेश आहे. या तिघांनी ८३६ युनिट वीज चोरी केले होती. त्याची १५ हजार ६०४ रुपये किंमत असून चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून तसेच तडजोड रक्कम ६ हजार आकारणी करून दंड भरण्याची नोटीस दिली होती. मात्र, या तिघांनी वेळेत दंड भरला नाही म्हणून या तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात मुकेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात हवालदार सुनील पाटील करत आहेत.