जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२४
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १९ वर्षीय तरूणीला गावातील एकाने आपल्या घरी बोलावून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तरूणीच्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या एका १९ वर्षीय तरूणीचा गत ८ महिन्यांपासून संशयित समाधान शेळके हा पाठलाग करत होता. तसेच कुणाला काहिही सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी देत होता. दरम्यान, या तरूणीस आपल्या घरी बोलवून त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच कुणाला काही सांगितल्यास भाऊ व आई- वडीलांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच १६ सप्टेंबरला सायंकाळी समाधानने मद्य प्राशन करुन तरूणीचा हात पकडून ओढले. तेथे शेजारी उभ्या असलेल्या तरूणीच्या मामाने तिला सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना ही त्याने मारहाण करत शिवीगाळ केली. याप्रकरणी तरूणीच्या फियार्दीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.