अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जगभर उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात साजरी होणार आहे. त्यासाठी अमळनेर शहर व तालुक्यात शिवजन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. शिवजयंती उत्सव समितीचा वतीने पारंपरिक पध्दतीने शिवजयंती साजरी होणार आहे. यावेळी अमळनेर शहरात ‘शिवरायांचा’ जयघोष होणार आहे. नाट्यमंदीर परिसर भगवमय करण्यात आले आहे.
मुख्य आकर्षण बोहरा स्कुलचे पथनाट्य, नारीशक्ती इव्हेंट गृपचा सजीव शिवजन्मोत्सव, मंगळ ग्रह मंदीर देखावा, एस पी गृप टाकरखेडा लाठ्या काठ्यांच कर्तब, सरस्वती शाळेचे लेझीम पथक, राजमुद्रा गृपचे ढोल पथक, राणाजी बँड, सजीव घोडेस्वार मावळे, द्रोण (राधे पवार ) फोटोग्राफी (राज डिजिटल विक्की जाधव व चेतन), अमळनेर युवा मित्र परिवार व नगरपरिषद अमळनेर यांच्या अनमोल सहकार्याने पाचपावली देवी मंदीरापासुन सकाळी १०-०० वा. पवन चौक, तिरंगा चौक, बस स्टँड, महाराणा प्रताप चौक व समारोप नाट्यमंदीर येथे होणार आहे.
यावेळी प्रतीक्षा पाटील यांचे व्याख्यान झाल्यावर प्रशासनाचा वतीने महाआरती करण्यात येईल मिरवणूकीत तुषार सोनार यांच्या वतीने दरवर्षी प्रमणे पिण्याच पाणी वाटप करण्यात येईल, नाट्यमंदीर येथे रणजीत शिंदे सर यांच्याकडून अल्पोहार वाटप करण्यात येणार आहे, पाचपावली देवी मंदीर येथे अल्पोहार विपूल गारमेंट्स कडून देण्यत येणार आहे.
भैय्या महाजन व राज लाड हे थंड पेय वाटप करणार आहेत. निलेश फार्मा व हॉटेल संजय यांच्या कडून लस्सी वाटप, खाँदेश रक्षक गृप कडून मिरवणूकीत शरबत वाटप करण्यात येणार आहे मोठ्या संख्येने थाटा माटात हजारोंचा सख्येने समील व्हावे व पारंपरिक पध्दतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन समितीचा वतीने करण्यात आले असुन सगळे मतभेद विसरुन ऐतिहासिक मिरवणूकीचे साक्षीदार व्हावे, पाचपावली देवी ते नाट्यमंदीर शिवजयंती मिरवणूकीत रिल्स, फोटो व व्हिडिओ व्हाट्स अप,इंन्स्टा, फेसबुक शेअर करा व मिळवा आकर्षक बक्षिसे हि स्पर्धा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजीत करण्यत आलेली आहे.