
जळगाव मिरर | १८ मे २०२५
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत असतो आज दिनांक 18 रोजी झालेल्या पाणीपुरवठ्यामध्ये अशुद्ध पाणीपुरवठा झाल्याने जळगाव मनपाच्या भोंगळ कारभारामुळे पुन्हा एकदा नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे चर्चा सुरू झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले प्रभाग क्रमांक एक दूध फेडरेशन रोड ते छत्रपती शिवाजीनगर परिसरात आज दिनांक 18 रोजी सकाळी झालेल्या पाणीपुरवठामध्ये अतिशय अशुद्ध पाणी पुरवठा झाला आहे यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते यावर महानगरपालिकेने तत्काळ उपाय योजना करावे अशी मागणी देखील परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
मनपाचे अधिकारी सुस्तावले !
जळगाव मनपातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे वेळोवेळी समस्यांचे तक्रारी करून देखील त्यावर उपाययोजना होत नसल्याने जळगाव मनपातील अधिकारी व कर्मचारी हे चांगलेच सुस्तावले आहे. परिसरातील अनेक भागात सुरु असलेले विकासकामे निकृष्ट दर्जाचे होत असल्यावर देखील मनपाचे अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे.