
जळगाव मिरर | २९ मे २०२६
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील एका लॉजमध्ये प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत रविंद्र संजय मोरे (वय २५) या प्रियकराचा मृत्यू झाला असून प्रेयसीला वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील गिरड येथील रवींद्र संजय मोरे हा युवक व पाचोरा तालुक्यातील एका गावातील तरुणीसोबत गुरुवारी सकाळी लॉजवर गेल होते. त्याठिकाणी प्रेमीयुगुलाने सोबत गळफास घेतला. परंतू यामध्ये रविंद्र मोरे याचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर दोघांना तात्काळ खाजगी रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत त्यास मृत घोषित केले. तर त्याच्या प्रेयसीला वेळीच उपचार मिळाल्यामुळे ती बालंबाल बचावली. मयत रविंद्र याच्या कुटुंबियांसह त्याच्या मित्रांन रुग्णालयात एकच आक्रोश केला. दरम्यान, ही घटना प्रेमसंबंधातून घडल्याची चर्चा असून पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.





















